सामाजिक शैक्षणिक राजकीय साहित्य कला अशा विविध क्षेत्रांमध्ये शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन नवी मुंबई येथील एमसीएम टीव्ही व साई सागर एंटरटेनमेंट चे संपादक जनार्दन शिंदे यांच्यावतीने भिवंडीतील सुनील झळके यांना “स्टार महाराष्ट्राचे” -2024 हा यंदाचा मानाचा पुरस्कार पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकताच पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे व संपादक जनार्दन शिंदे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करून,त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सुनील झळके हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक साहित्य लेखन पत्रकारिता सहकार कला इत्यादी क्षेत्रांमध्ये कार्यरत असून त्यांना यापूर्वी विविध संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांच्या या क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत त्यांना हा यंदाचा स्टार महाराष्ट्राचे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘माझी आई निरक्षर असून सुद्धा मला तिने साक्षर बनवले आणि पुढे जाण्यास नेहमीच प्रोत्साहन दिल्याने हा पुरस्कार मला प्राप्त झालेला आहे, त्यामुळे हा पुरस्कार मी माझ्या आईच्या चरणी अर्पण करतो.’अशा शब्दात त्यांनी आपल्या आईप्रति प्रेम आणि आदर व्यक्त केला.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी विनोदी अभिनेते जॉनी रावत राजेश खर्डे वेसावकरांचे परंपरा अतुल धोत्रे बाळूमामा फेम पनवेल महानगरपालिकेच्या नगरसचिव मनीषा बाविस्कर व इतर अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते.