नेरपिंगळाई प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डाॅक्टरांची मागणी
माजी उपसभापती पंचायत समिती मोर्शी सोनाली नवले
गावाकडची बातमी
नेरपिंगळाई/प्रतिनिधी.
अमरावती,मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई सर्वात मोठे गाव असून येथील लोकसंख्या २५००० हजारांवर आहे. तसेच आजुबाजुच्या गावाची मुख्य बाजारपेठ असून या ठिकाणी आजुबाजुच्या गावातील नागरिक शासकीय निमशासकीय सह इतर साहित्याची खरेदी सह आरोग्य विषयक कामांसाठी येथे येतात गावातिल नागरीकांसह आजुबाजुला गावातील नागरीकांचे आरोग्य पुर्ण पणे येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे. परंतु महिन्यांपूर्वी येथिल महिला डॉक्टर चे आकस्मिक निधन झाल्याने येथील डॉक्टर चे पद हे रिकामे झाले. व दुसरे डॉक्टर हे सुद्धा आरोग्य केंद्रात उपलब्ध नाही बऱ्याच दिवसांपासून रजेवर आहे किंबहुना ते सुद्धा सतत गैरहजर राहतात त्यामुळे येथील आरोग्य केंद्रात येणाऱ्या रूग्णांना मोर्शी, अमरावती, कींवा खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. गरोदर रूग्णांना अत्यावश्यक सेवेच्या किंवा प्रसूती च्या वेळेस डाॅक्टर उपलब्ध नसल्याने बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे मध्यरात्री कोणत्याही प्रकारची आरोग्य विषयक समस्या उद्भवल्यास मोर्शी किंवा अमरावती शिवाय पर्यायच नसल्याने तसेच सध्या संपूर्ण नेरपिंगळाई सह जिल्ह्यात साथिचे रोग सुरू आहे अशावेळेस डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू सारख्या साथिच्या गंभीर आजाराचा गावात शिरकाव झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते अशी वेळ येऊ नये यासाठी नेरपिंगळाई येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ आरोग्य अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम सोबत फोन वर चर्चा करून उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती जोशी साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आसोले यांच्या सोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.
यावेळी सोनाली नवले माजी उपसभापती पंचायत समिती मोर्शी ह्या आक्रमक झाल्या तेव्हा अमरावती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आसोले यांनी ५ तारखेपर्यंत कंञाटि डॉक्टर उपलब्ध करून देणार असे आश्वासन दिल्यानंतर समाधान व्यक्त केले यावेळी कल्पना पाकोडे विधानसभा प्रमुख तिवसा भाजप, प्रमोद घाटे युवा शक्ती ग्रामविकास संगठन जिल्हा उपाध्यक्ष तथा पत्रकार, अन्सार कुरेशी ग्रामपंचायत सदस्य,रुपेश गणेश ग्रामपंचायत सदस्य,सुरज कुरसंगे ग्रामपंचायत सदस्य नेरपिंगळाई उपस्थित होते.