Wednesday, October 9, 2024
Google search engine
Homeअमरावतीरोहयोच्या कामपूर्ण होवून मस्टर दिरंगाई केल्याच्या कारणावरुन प्रहारचे अजय चौधरी वांचे नेतृत्वात...
spot_img
spot_img

रोहयोच्या कामपूर्ण होवून मस्टर दिरंगाई केल्याच्या कारणावरुन प्रहारचे अजय चौधरी वांचे नेतृत्वात वरुड पं.स.मध्ये घेराव

Oplus_131072

गटविकास अधिकारी यांची हलगर्जी करणाऱ्या रोजगार सेवकाला तात्काळ नोटीस

दोन दिवसांत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याचे आदेश

रोजगार हमी योजनेतुन पोरगव्हाण येथील सामुहिक सिंचन विहीरीचे काम पूर्ण होवून चार महिने लोटूनही हेतुपुरस्सरपणे कामगारांच्या व लाभधारकांच्या खात्यात पैसे न टाकल्याच्या कारणावरुन प्रहारचे अजय चौधरी यांचे पं.स.ला खडे बोल.

याबाबत सविस्तर असे की, वरुड तालुक्यातील पोरगव्हाण येथे गत ४ महिन्यांअगोदर रोजगार हमी योजनेतुन सामुहिक सिंचन विहीरीचे काम करण्यात आले. परंतु आजपोवेतो पोरगव्हाण येथील रोजगार सेवक याने हेतुपुरस्सर मस्टर न काढल्याने कामगारांची मजुरी रखडली. सोबतच लाभार्थ्यांनी उसणवार पैसे घेवून सिंचन विहीरींचे बांधकाम पूर्ण केले परंतु रोजगार सेवकाने मस्टर न काढल्याने सर्व अनुदान रखडले. या संदर्भात पं.स. पोरव्हाण येथील रोहयो कामगारांनी पं.स.ला वारंवार निवेदन देवून आपली मजुरी खात्यात जमा करण्याची विनंती केली. तरी सुध्दा पं.स.वरुड कडून कामगारांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेवटी गत २३ सप्टेंबर रोजी आठ दिवसांत खात्यात पैसे न आल्यास आत्मदहनाचा इशारा पोरगव्हाण येथील रोहयो कामगारांनी दिला होता. तरी सुध्दा पं.स.चे रोजगार हमी विभागाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने कफल्लक झालेल्या रोहयो कामगारांनी प्रहार चे अजय चौधरी यांच्याकडे मदत मागीतली. त्याच अनुषंगाने आज दि.३०/०९/२०२४ रोजी प्रहारचे अजय चौधरी यांचे नेतृत्वात पोरगव्हाण येथील समस्याग्रस्त रोहयो मजुर यांनी हातात पेट्रोल ची डपकी घेवून स्थानिक पं.स. कार्यालय गाठले.

सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत प्रहारचे अजय चौधरी यांचे नेतृत्वात पोरगव्हाण येथील रो.ह.यो.मजुर यांनी पं.स.चे रोजगार हमी प्रमुखाला घेराव घालुन समस्या का निकाली निघाली नाही या संदर्भात जाब विचारला. तसेच मजुरांचे श्रमाचे पैसे जर ४-४ महिने त्यांना मिळत नसतील तर त्यांच्या कुटूंबियांनी जगावे कसे तसेच लाभार्थ्यांनी विहिर बांधकाम पूर्ण करण्याकरीता पं.स.च्या आशेवर जी उसणवार पैसे घेतले त्याच काय असा प्रश्न ही येथे उपस्थित करण्यात आला.यावेळी पं.स.अधिकारी यांनी पोरगव्हाण येथील रोजगार सेवक यांना फोन करुन बोलावले असता ते पं.स. उपस्थित झाले नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल होईल अशी माहिती दिली. त्याने पं.स.अधिकारी व आंदोलक यांचे समाधान झाले नसल्याने पं.स. कडून तिथेच नोटीस बजावण्यात आली.

कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे अथवा हेतुपुरस्सरपणे जर नागरिकांच्या समस्या निकाली निघत नसेल तर शासनाच्या दप्तर दिरंगाई कायद्यानुसार संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येते. सोबतच पोलीसांत गुन्हा ही दाखल करता येतो. ती कारवाई या प्रकरणात का करण्यात येवू नये असा ही सवाल अजय चौधरी यांनी केला. आंदोलक, पं.स.अधिकारी यांच्या यांच्यामध्ये जवळपास ४ तास तु-तु मै-मै चालली.. यावेळी कायदा व सुव्यवस्थेला तडा जावू नये म्हणुन वरुड येथील पोलीस कर्मचारीही येथे उपस्थित होते.

एकंदरीत आज दिवसभर पं.स.मध्ये चाललेल्या या घटनाक्रमाने वरुड तालुक्यातील इतर ग्रामपंचायतमध्ये असे कारभार होत असल्याने तेही चव्हाऱ्यावर येण्याची शक्यता दिसत आहे या वेळी संतोष निमघरे,लीलाधर काकडे ,प्रफुल गोहळ,मयुर सरदार , माला सरदार,
ओंकार सरदार, धीरज सरदार,वंदना सरदार,बबन सरदार,मनोज सरदार, सुनंदा सरदार,चंद्रशेखर सरदार,सतिस सरदार,सुनंदा सरदार, लक्ष्मण ढोमणे,वर्षा ढोमणे,ललिता सरदार ,विनोद मुकिंदराव सरदार ,प्रियांशु इंगले,शंकर सरदार,काजल सरदार,सुशिला सरदार,किशोर यावले व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page