प्रियंका धायगुडे यांचे विरुध्द शिस्तभंग कारवाईसाठी आत्मदहन इशारा…सुनील शर्मा.सां.कार्यकर्ता
वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कैलासराव बनसोड.
वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या हक्कासाठी लढा देणारे व भ्रष्टाचाराला उघड करणारे सुनील श्रीराम शर्मा यांनी आता थेट प्रधानमंत्रीच्या सभेमध्ये आत्मदहन करण्याचा इशारा दिला. सुनील शर्मा यांनी यापूर्वी तहसील कार्यालय मालेगाव येथे वार्ड क्रमांक १२ १४ १७ येथे झालेल्या सिमेंट काँग्रेस रस्त्याच्या भ्रष्टाचार विरोधात चार वेळा उपोषण केले त्या चारही वेळी उपविभागीय अभियंता श्रीमती प्रियंका धायगुडे संबंधित कामाची जातीने चौकशी करून या तीन वर्षाच्या कालावधीत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही मिळाल्या कारणामुळे थेट आता प्रधानमंत्री यांच्या होणाऱ्या सभेमध्ये आत्मदहन करण्याचा इशारा केला आहे सुनील शर्मा यांच्याशी थेट भेट घेतली असता त्यांनी असे सांगितले इथे कायदा आणि व्यवस्था आहे परंतु कायदा आणि व्यवस्था ही अधिकारी यांनी रखेली झालेली आहे त्यामुळे मोठ्या भ्रष्टाचाराला तोंड दिले जात असून हे पैसे जनतेचे आहेत अधिकाऱ्याचे नाही” अधिकारी हे त्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यघटना तरतुदीनुसार जबाबदाऱ्या केलेल्या आहेत , परंतु या अधिकाऱ्यांनी कायदा व्यवस्था वेशीला टांगली असल्या कारणामुळे इथे सामान्य नागरिकाची कोंडी होत आहे म्हणून आपण भ्रष्टाचाराला तोंड फुटण्यासाठी उपोषणाचा हत्यार भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार हाती घेतलेला असून जोपर्यंत कार्यवाही होणार नाही त्या मुळे आम्ही व्येठीत होऊन आमचे जीवित्व संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला असून होणाऱ्या सभेमध्ये न्याय न मिळाल्यामुळे मी आत्मदहन करणार असल्याचे सांगितले आहे.
प्रस्तुत प्रकरणात अधिक्कमहिती मिळालेली की, मालेगाव येथे करण्यात आलेले नावीन्यपूर्ण योजनेची यामध्ये काम झाल्याचे दिसून येत आहे त्या बाबीच्या नोंदी मोजमाप पुस्तके मध्ये करण्यात आली व कामांमध्ये आतापर्यंत कोणत्याच अधिकाऱ्यांनी म्हणजेच कार्यकारी अभियंता यांनी त्यांना असलेल्या अधिकारानुसार केलेल्या कामाची पाहणी करण्यात आली तरी देखील पाच कोटी रुपये पर्यंत कनिष्ठ अभियंता व श्रेणी अभियंता यांनी संबंधित ठेकेदाराला रकमा काढून दिलेले आहेत आणि झालेल्या भ्रष्टाचारामुळे व या आंदोलनामुळे ठेकेदाराला त्याची रक्कम पुरेशी मिळाल्यामुळे ठेकेदारांनी काम करण्याला दिरंगाई व कानाला हात दिलेले तरीदेखील ज्या अधिकाऱ्यांनी तातडीने हा रकमा काढून दिल्या तेच अधिकारी म्हणतात की आम्ही काम करून घेऊ मात्र आता काम करण्यासारखा कोणताही जॉब अंदाजपत्रकानुसार राहिलेला नसून आता त्या कामावर जोपर्यंत निधी मिळणार नाही तोपर्यंत ते काम होणारच नाही अशी जनतेत बोलल्या जात आहे तर त्यामुळेच सामाजिक कार्यकर्ते सुनील शर्मा यांनी आता काम करण्याऐवजी केवळ आता श्रेणी एक अभियंता श्रीमती धायगुडे यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्याचे हत्यार सुनील शर्मा यांनी यांनी उपसले असून प्रधानमंत्री यांचे सभे मध्ये आत्मदहन करण्याचा इशारा केला आहे.