वर्धा , मंगला भोगे : जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधुन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय व जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृध्दाश्रम येथे जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातोश्री वृध्दश्रमाच्या पुष्पलता देशमुख तर महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष प्रा. शेख हाशम व योग शिक्षक दामोदर राऊत यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती होते.
आरोग्य हेच खरे धन आहे, आणि आपले आरोग्य सुदृढ व सुस्थितीत ठेवण्याकरीता नियमित झेपेल तेवढा व्यायाम करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संतुलीत आहार करणे, किमान 20 मिनीट पायदळ चालण्याची सवय अंगी बाळगल्यास आरोग्य सुस्थीतीत ठेवण्यास मदत होईल असे विचार श्री. हाशम यांनी व्यक्त केले.
यावेळी श्री. राऊत यांनी योगासन व प्राणायम यांचे महत्व सांगितले. तर श्रीमती देशमुख यांनी गेल्या 23 वर्षापासुन सदर वृध्दाश्रम चालविण्यात येत असून वृध्दाश्रमातील सदस्य माझ्या परिवाराचा एक भाग झाले असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण निरिक्षक गोपाळ अनासाने यांनी केले प्रास्ताविक जयश्री सराफ यांनी तर आभार एस.डी.लिहीतकर यांनी मानले. कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे विणा शेंडे, किशोर थुल, आशिष तामगाडगे, शोभा ठाकरे, राज मरापे, सुमित कांबळे तसेच मातोश्री वृध्दाश्रमातील कर्मचारी व निवासी वृध्द उपस्थित होते.