Monday, June 24, 2024
Google search engine
Homeकृषीक्रांती ज्ञानपीठ इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकाविला प्रथम क्रमांक
spot_img
spot_img

क्रांती ज्ञानपीठ इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकाविला प्रथम क्रमांक

 

आष्टी, मंगला भोगे: – पंचायत समिती आष्टी व्दारा 51वे विज्ञान प्रदर्शनी हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय आष्टी येथे संपन्न झाली.
आष्टी तालुक्यातील सर्व शाळांनी सहभागी होऊन एकूण 49 प्रॉजेक्ट मांडण्यात आले होते. त्यापैकी क्रांती ज्ञानपीठ शाळेच्या विद्यार्थ्यांनी वेस्ट मटेरियल पासून शेतकरी उपयोगी पेरणी यंत्र तयार करुन सर्वांचे लक्ष वेधून प्रथम क्रमांक पटकाविला वर्ग सातवी चे विद्यार्थी शिवम राधेशाम कलंत्री व कु आश्लेषा नरेश ठाकरे यांनी गरीब शेतकऱ्यांचा ज्यांच्या कडे बैल जोडी नसल्याने पेरणी माघारते व मार्केट मध्ये उपलब्ध असलेले आधुनिक महागळे यंत्र विकत घेऊ शकत नाही.

अशा गरीब शेतकऱ्यांचा विचार करुन पेरणी यंत्र तयार करुन डिजिटल इंडिया बनविण्याकरिता गरीब अल्प भूधारक शेतकऱ्यांवर जास्त भर देण्याची गरज असल्याचे प्रदर्शनी व्दारे आपले विचार मांडले.
त्यांच्या या कल्पकतेचे कौतुक करतं आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यावले व गटशिक्षणाधिकारी देशपांडे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा ठाकरे यांनी मार्गदर्शन शिक्षक भूषण चौधरी  व गुलाम रझिक तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे आभार मानून विद्यार्थ्यांसह सगळ्यांचे अभिनंदन केले..

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page