पत्रकार दिनानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन ; राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांचा उपक्रम
मूर्तिजापूर – आपल्या लेखणीतून समाजाला जागृत ठेवण्याचे माध्यम म्हणजे पत्रकार असे प्रतिपादन माजी आमदार अॅड भैयासाहेब तिडके यांनी केले.
शहरातील समता नगरातल्या पटवारी कॉलनी येथील भक्तीधाम मंदीर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व स्व.रमेशचंद्र राठी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाच्या पर्वावर आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
मराठी पत्रकारितेचे जनक आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमांला उपस्थीत मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाला रितसर सुरुवात झाली. माजी आमदार अॅड भैय्यासाहेब तिडके,इब्राहिमभाई घाणिवाला,जेष्ठ पत्रकार विलास मुलमुले,पुरुषोत्तम बोळे,प्रा.अविनाश बेलाडकर,दीपक अग्रवाल, रामकृष्ण गावंडे,रवि राठी,राम कोरडे,संदीप जळमकर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांनी रोजगार मेळावा आयोजना बाबतची भूमिका विशद करत असताना समाजाचा एक घटक म्हणून छोट्या छोट्या कार्यक्रमातून समाजाचे हित कसे साधता येईल व बेरोजगारीवर मात कशी करता येईल या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि तिन दिवस चालणाऱ्या मेळाव्याचा तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. याआधी सुद्धा आपण व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन केले होते त्यामध्ये सुद्धा तिनशेच्या वर नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला आहे आणि त्यापैकी काही नागरिकांची जर व्यसनापासून मुक्ती झाली तर मला त्या परिवाराला मिळणारे सुख त्यातून मला आनंद व्यक्त होऊन पुण्याच्या मार्ग लाभेल असं यावेळी सांगितले. यावेळी शहरासह तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार बांधव व युवक उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी तर आभार प्रदर्शन जेष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर यांनी केले.