Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeअकोलामूर्तिजापूरात नमो चषक मॅरेथॉन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद ; प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला...
spot_img
spot_img

मूर्तिजापूरात नमो चषक मॅरेथॉन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद ; प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला प्रणव खंडोबल्लर

आमदार हरिष पिंपळे यांनी दिली हिरवी झेंडी ; ७१ वर्षीय मनोहर ताकतोडे यांनीही घेतला सहभाग

मूर्तिजापूर – शहरात नमो चषक मॅरेथॉन स्पर्धा भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले होते.या मॅरेथॉन स्पर्धेला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेत मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरिष पिंपळे यांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक व भव्य क्रीडा विविध स्पर्धा तालुक्यात आयोजित केल्या होते आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमदार हरिष पिंपळे यांनी हिरवी झंडी दिली सदर स्पर्धेत ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग झाला होता कार्यक्रमाला शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे,ज्येष्ठ पत्रकार विलास मुलमुले, दीपक अग्रवाल ,माजी नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे, तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे, शहर अध्यक्ष रितेश सबाजकर , राजू कांबे ,कमलाकर गावंडे ,कोमल तायडे, आयुषी तायडे ,अमोल प्रजापती,गोपाल दायमा व इतर अनेक भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते.

मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रणव खंडोबल्लर याला ५१०० रुपये बक्षीस देण्यात आला तसेच द्वितीय क्रमांक आकाश मोरे याला ३१०० तृतीय अजय होले यांना २१०० रुपये बक्षीस आमदार हरिष पिंपळे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता पोलीस विभागातील उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी क्रीडा क्षेत्रातील ज्ञानेश टाले, विनोद काळबांडे, दिनेश श्रीवास शहरातील क्रीडा क्षेत्रातील युवक शिक्षक यांनी विशेष सहकार्य केले विशेष म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसोबत मनोहर ताकतोडे ७१ वर्ष हे सुद्धा धावले त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page