Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeअमरावतीनेरपिंगळाई येथे मृत गाईची विल्हेवाट लावण्यासाठी सरपंचाची टाळाटाळ
spot_img
spot_img

नेरपिंगळाई येथे मृत गाईची विल्हेवाट लावण्यासाठी सरपंचाची टाळाटाळ

 

नेरपिंगळाई येथे मृत गाईची विल्हेवाट लावण्यासाठी सरपंचाची टाळाटाळ

ग्रामपंचायत सदस्य सुरज कुरसंगे यांचा आरोप

प्रतिनिधी प्रमोद घाटे सह प्रविण पाचघरे

मोर्शी :  नेरपिंगळाई नेरपिंगळाई येथे एक/दोन दिवसांपासून नवरंगपुरा वार्ड क्रं ५/६ मधिल पिण्याच्या पाण्याचा टाकीच्या जवळपास नेरपिंगळाई ते धानोरा रोड जवळ गायीचा मृतदेह पडलेला असुन गाईचा मृतदेह कुत्री लचके तोडून तोडून खात आहे. गाईचा मृतदेह हा मध्य वस्तीत असून त्यामुळे सर्वत्र घान वास पसरला असून रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी सरपंच सविता खोडसकर घेतिल का.?

कि नागरीकांना आजाराच्या अंधारात ठेवून फक्त बघ्याची भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

 

या सर्व प्रकरणाची माहिती ग्रामपंचायत सदस्य सुरज कुरसंगे यांनी सरपंच सविता खोडसकर यांच्या सोबत फोनवर देण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला परंतु सरपंच सविता खोडसकर यांनी फोन आपसी मतभेदांमुळे उचलला नाही याची चर्चा होत आहे त्यामुळे मात्र सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे यावर लवकरात लवकर उपाय योजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य सुरज कुरसंगे यांनी दिला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page