Monday, May 20, 2024
Google search engine
Homeगावाकडची बातमीसंभाव्य टंचाई लक्षात घेऊन नियोजन करा ;  जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निर्देश
spot_img
spot_img

संभाव्य टंचाई लक्षात घेऊन नियोजन करा ;  जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निर्देश

संभाव्य टंचाई लक्षात घेऊन नियोजन करा ;  जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निर्देश

नायगाव, बिलोलीत अधिकाऱ्यांसोबत आढावा;गावागावातील जलसंधारणाच्या कामाला गती द्या

 

नायगाव प्रतिनिधी बालाजी शेवाळे

 कालच्या खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज नायगाव व बिलोलीमध्ये तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संभाव्य टंचाईला लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश दिले.

नायगाव, बिलोली येथील अधिकाऱ्यांसोबत आज झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी संभाव्य पाणीटंचाई परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी  जिल्हाधिकारी यांनी पुढील एक महिन्यात जलसंधारणाची कामे प्राधान्याने करा तलावातील गाळ काढणे आपल्या भागातील पाणी आपल्याच भागात मुरेल यासाठी तलावांची कामे लोकसहभागातून करणे नरेगा अंतर्गत शोष खड्ड्यांची कामे फळ बाग लागवड कामे करणे इ नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, चाऱ्याची उपलब्धता, जलजीवन अंतर्गत सुरू असलेल्या कामाची स्थिती, पुढील दीड महिन्यात प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे सुरू करण्याबाबतची अधिकाऱ्यांची आखणी, त्यांनी यासाठी केलेले नियोजनाचा आढावा घेतला.

Oplus_131072

जूनच्या मध्यात मान्सूनच्या आगमनाची शक्यता आहे.तोपर्यंत सर्व यंत्रणेकडे दीड महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे झाली पाहिजे.परंपरागत जलसाठे गाळमुक्त करणे गरजेचे आहे. गाव तलाव, गावालगतचे नाले, जुने बंधारे याचे खोलीकरण रुंदीकरण विस्तारीकरण लोकसहभागातून होतील याकडे लक्ष देण्याची त्यांनी सांगितले नागरिकांनी देखील आपला जिल्हा हा पाणीटंचाईचा जिल्हा असून जलस्त्रोत वाढण्यासाठी या काळात लोकसहभागातून होणाऱ्या जलसंधारण कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

या बैठकीला नायगाव, बिलोली तालुक्याचे तहसीलदार ,तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, जलसंधारण व तालुका पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, याचेसह इ अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रलंबित कोणतीही कामे राहणार नाही याकडे लक्ष वेधण्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.

टंचाई रोखण्यासाठी नायगाव तहसील प्रशासनाकडून एकुण 43 विहीत नमुन्यात बोअर अधिग्रहण प्रस्ताव प्राप्त 9 मंजूर. ईतर 34 प्रस्ताव उपजिल्हा अधिकारी कार्यालय बिलोली यांचेकडे कडे पाठविण्यात आल्याची माहिती नायगाव तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी दिली..

 

Oplus_131072
spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page